
एसएमसमाचार-प्रतिनिधी-कृष्णा वाघमारे.
अहिल्यानगर :रामोशी, बेरड, बेडर समाजातील नोकरदार वर्गाला एकत्र आणून समाजाला मुख्य प्रवाहात सामील करण्याच्या उद्देशाने आयोजित नोकरदार परिषदेचे आयोजन रविवारी अहिल्यानगर (श्रीगोंदा) येथे उत्साहात पार पडले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.मुंबई, नवी मुंबई, ठाणे, सातारा, पुणे, पिंपरी-चिंचवड, अहिल्यानगर, श्रीगोंदा, सांगली, धाराशिव इथून प्रतिनिधी सहभागी झाले.परिषदेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, 10वी–12वी मध्ये मेरिट प्राप्त विद्यार्थी तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.रेखा बापूराव शिंदे (वरिष्ठ ठाणे अंमलदार) — वेट लिफ्टिंगमध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर मिळवलेल्या सुवर्णपदकांसाठी गौरव.
किरण खराडे सर — समाजाच्या इतिहास संशोधन आणि जनजागृती कार्यासाठी सन्मान.
गौरी घाडगे — नवोदित गायिका म्हणून समाजाचा गौरव वाढविला.
कांचन नाईक — महिला पत्रकार आणि समाज उन्नती साठी प्रयत्नशील व्यक्तिमत्व.
तेजश्री खंडागळे — राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेत दोन रौप्यपदक विजेती.
👉 “रामोशी, बेरड, बेडर समाज हा प्रामाणिक, राष्ट्रनिष्ठ आणि देशासाठी लढणारा समाज आहे.”
👉 “छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक व स्वातंत्र्यवीर उमाजी नाईक यांच्या पराक्रमामुळे या समाजाने इतिहासात गौरवशाली स्थान मिळवले आहे.”
👉 “शिक्षण, व्यवसाय आणि सरकारी सेवेकडे युवकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.”
👉 “समाजातील अंधश्रद्धा दूर करून प्रबोधनाच्या दिशेने पावले उचलणे आवश्यक आहे.”
👉 “तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून स्वतःची व समाजाची प्रगती साधावी.”
प्रमुख मार्गदर्शक व उपस्थित मान्यवर
मा. श्री. कॅप्टन अर्जुन लिंगाळे (निवृत्त लष्करी अधिकारी),
मा. श्री. मधुकर ममाळे (माजी मुख्याध्यापक),
मा. श्री. जयवंतराव शिरतर (ज्येष्ठ पत्रकार),
मा. श्री. आबासाहेब जाधव (कर वसुली अधिकारी),
मा. श्री. प्रा. शंकर जाधव (उपप्राचार्य),
मा. श्री. देवराम गुलवे सर, मा. श्री. डॉ. प्रा. अशोक शिंदे,
मा. श्री. राधाकिसन जेडगुळे, मा. श्री. बाबासाहेब भोंडटे,
मा. श्री. श्रीकांत भोंडटे. तर प्रमुख उपस्थितीमध्ये
मा. श्री. मेजर अंकुश चव्हाण, मा. श्री. मेजर विजय चव्हाण,
मा. श्री. डॉ. मोहन पांडे, मा. श्री. समाधान वाघमोडे,
मा. श्री. रविंद्र शिरतर, मा. श्री. डॉ. देविदास पांडे,
मा. श्री. दिलीप खंडागळे, श्रीमती वर्षा पांडे-भोंडटे,
मा. श्री. नंदू बोराडे,मा. श्री. मल्लारी खंडागळे,
मा. श्री. राजाभाऊ चव्हाण यांचा समावेश होता.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
मा. श्री. गजानन ढवळे (गुरुजी), मा. श्री. अंकुश ढवळे (मेजर),मा. श्री. अॅड. संतोष शिंदे (सामाजिक न्याय सल्लागार) यांच्या नेतृत्वाखाली झाले
संयोजनात श्री. संजय ढवळे, अमोल ढवळे, सतीश शिंदे, रामदास पोळ, दादा पोळ, शंकर भोईटे, अनिल भोईटे, पांडुरंग भोईटे, अनिकेत ढवळे, संकेत ढवळे, गणेश ढवळे, युवराज शिंदे, विशाल ढवळे, सुहास ढवळे, विक्रांत भोईटे, किरण भोईटे, विशाल भोईटे यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
खुप छान
Congratulations Kanchan Jamboti Naik