आप चे राजू थोरात यांचा शिवसेनेत प्रवेश!

Share

एसएमएस- प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई :आम आदमी पार्टीचे मुंबईतील प्रमुख कार्यकर्ते राजू थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्वतः त्यांच्या हाताने शिवबंधन बांधून नव्या शिवसैनिकांचे स्वागत केले.

या प्रसंगी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, विभागप्रमुख सोमनाथ सांगळे तसेच इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी बळकट झाल्याची भावना या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.


Share

4 thoughts on “आप चे राजू थोरात यांचा शिवसेनेत प्रवेश!

  1. कोणत्याही पक्षात ये, जा करा.मात्र, जनतेचं भलं करा इतकंच.

  2. The UBT Sena is expected to sweep the polls in the upcoming Corporation elections in Mumbai and so where there is honey, the bees are bound to attract

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *