उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद –

Share


एसएमएस -प्रतिनिधी-मिलन शहा

“शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी”

पैठण : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. दगाबाज राज्य सरकारने जाहीर केलेल्या अतिवृष्टी नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती घेत, “या कठीण काळात मी शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असा ठाम विश्वास उद्धवसाहेब यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “मराठवाड्यातील शेतकरी राजा भोळाभाबडा आहे, पण इतिहासात कधी नव्हे एवढ्या मोठ्या संकटात आज तो सापडला आहे. पॅकेजच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा उडवली आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हक्कासाठी लढा दिला पाहिजे,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते विनोद घोसाळकर, सुभाष पाटील, ज्योती ठाकरे, आमदार मिलिंद नार्वेकर, उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, तालुकाप्रमुख मनोज पेरे, तसेच महिला आघाडीच्या सुनीता जिल्हा संघटक राखी परदेशी व आशा दातार उपस्थित होत्या.

उद्धव ठाकरे यांच्या या संवाद दौऱ्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नवचैतन्य मिळाल्याचे चित्र दिसून आले.


Share

4 thoughts on “उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद –

  1. शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे खर तर कोणि ही उभा राहत नाही बस कोटि आश्वासन देतात आपला हेतु साधुन घेतात

  2. गेल्या कैक वर्षांपासून अशीच आश्वासनं देत आले आहात.त्यामुळे आश्वासने देणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची अजिबात गरज नाही.उलट शेतकरीच उभ्या महाराष्ट्राच्या मागे खंबीरपणे उभे आहेत हे आश्वासन देणाऱ्यांनी जरूर जाणून घ्यावे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *