
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक नामवंत नेत्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. सांगलीतील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य विजय बागेळी-पाटील, मोहन कांबळे, तसेच राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे श्रीशैल उमराणी आणि शशिकांत जाधव, तर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे सचिन मोहिते व सागर रायते यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाला बळ दिले.
या सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. या प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना नेते-सचिव विनायक राऊत, उपनेते व संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या नव्या प्रवेशामुळे सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संघटन अधिक बळकट होणार असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.
Nice
तिकिटा साठी ये जा करु नका तर जनतेच्या विकासाठी आलात तर खरच मनापासुन आपणास खुप खुप शुभेच्छा
खरंतर निष्ठावंत कार्यकर्ते असले की संघटना बळकट होते.मात्र, परिस्थिती नुसार प्रत्येक पक्षात out going करणारे नेतेमंडळी सामान्य ” मतदार ” जनतेच्या टाळू वरचं लोणी खाऊन याच जनतेच्या जीवावर हे नालायक पुढारी कशी मजा मारतात ते पहा याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल…
शेवटी सरकार कुठलेही असो सामान्य जनता कायम करदाती राहील यात तिळमात्र शंका नाही.
चलती का नाम गाड़ी