पोलीस अजय गव्हाणे यांच्या निधनाने शोककळा..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई: मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल अजय गव्हाणे यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण पोलीस दल तसेच सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या उपचारासाठी मुंबई पोलिसांनी आणि हिंदुजा हॉस्पिटलला भरीव सहकार्य केले. उपचारानंतर गव्हाणे यांचे पार्थिव गावी पाठवण्यासाठी देखील पोलिसांनी सर्वतोपरी मदत केली.

हिंदुजा हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांच्या सेवेची दखल घेत, रुग्णालयाच्या बिलात सूट देत संवेदनशीलतेचा आदर्श दाखवला. या संपूर्ण प्रक्रियेत इस्पेक्टर सानप यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत गव्हाणे कुटुंबाला योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

मुंबई पोलिसांनी गव्हाणे यांच्या सेवेला सलाम करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून विभागात त्यांच्या आठवणी कायम राहतील.तसेच शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्या प्रयत्नाने हॉस्पिटल बिलाची रक्मेत मोठी सूट मिळवून दिली.


Share

4 thoughts on “पोलीस अजय गव्हाणे यांच्या निधनाने शोककळा..

  1. पोलिसाने आपल्या तबेतीला जपन फार गरजेचे आहे २४ तास काम करतात सरकारने थोडि कामात सवलत दयाला हवी पोलिस काम करतात म्हणून आपण शान्त पणे आपण आपल्या घरात झोपतो आज फार वाईट वाटते आपलच कोणी तरी भाऊ गेला असे वाटते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *