जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र कालावश ?

Share

एसएमएस -प्रतिनिधी –सुरेश बोर्ले

मुंबई बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील जेष्ठ व श्रेष्ठ अभिनेते स्व. धर्मेंद्र यांचे काल मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते.

अनेक दिवसांपासून ते आजारी होते. शेवटचा काळ त्यांनी लोणावळा येथील फॉर्महाऊसवर शेतकी कामात आणि साध्या जीवनात व्यतीत केला.

१९६० च्या दशकात मुंबईत आल्यावर त्यांनी सहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवला. मात्र खरी ओळख त्यांना ‘फुल और पत्थर’ या चित्रपटानंतर मिळाली. त्यानंतर ‘यकीन’, ‘रखवाला’, ‘कहानी किस्मत की’, ‘यादों की बारात’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले.

‘शोले’ चित्रपटातील ‘वीरू’ या भूमिकेमुळे त्यांनी अमरत्व मिळवले. त्यांच्या काळात प्रसिद्ध फाईट मास्टर मधु शेट्टी यांच्याशी असलेली त्यांची जोडी अॅक्शन सीन्ससाठी ओळखली जायची.

त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तब्बल ६५ वर्षे त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची अविरत सेवा केली.

त्यांच्या पश्चात दोन पत्नी, तीन पुत्र आणि दोन कन्या असून सर्वच चित्रपट क्षेत्राशी निगडित आहेत.

मात्र त्यांच्या मुलगी समाज माध्यम X वर पोस्ट करून टे जीवित आहेत आणि प्रकृतीत सुधार होत असल्याचे म्हटले आहे.


Share

3 thoughts on “जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र कालावश ?

  1. धर्मेंद्र जी आप हमेशा हमारे दिल में रहेंगे ईश्वर आपकी आत्मा को शान्ती प्रदान करे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *