
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई : मालाड (प.) व्यासवाडी परिसरातील मढ जेट्टी रोडवर उभ्या राहिलेल्या मोठ्या बेकायदेशीर आरसीसी बंगल्या विरोधात अखेर पालिका पी/उत्तर विभागाने हातोडा चालवला आहे. परवानगीशिवाय मोकळ्या जागेवर बांधकाम सुरू असल्याचे आढळल्यानंतर पालिकेने महिनाभरापूर्वीच काम थांबवण्याची नोटीस बजावली होती. मात्र, बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याने गुरुवारी पालिकेने कारवाई केली.
सदर ठिकाणी राजकीय नावे असलेले बॅनर लावून पालिकेची कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्ट्स फिरत होत्या. परिसरात दबावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तरीही पालिकेने दुसरी तपासणी करून उल्लंघनाची खात्री केली. त्यानंतर २४ तासांची मुदत देऊन अखेरीस बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांच्या आदेशानुसार करण्यात आली. पथकात सहाय्यक अभियंता राजेश सोनवणे, उपअभियंता सुहास घोलप आणि कनिष्ठ अभियंता कृष्णा बडे यांचा समावेश होता.
“परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम खपवून घेतले जाणार नाही. भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामांवर आणखी कठोर पावले उचलली जातील,” असा इशारा सहाय्यक महापालिका आयुक्त कुंदन वळवी यांनी दिला.
स्थानिकांकडून पालिकेच्या तत्परतेचे स्वागत करण्यात येत असून, या कारवाईमुळे मढ परिसरातील बेकायदेशीर बांधकामदारांना चांगलाच धडा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मालाड पश्चिम येथील मढ याठिकाणी अजूनही अनेक अशी अनधिकृत बांधकामे आहेत जी पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच उभी आहेत.वेळोवेळी पी/उत्तर महापालिका संबंधित खाते तसेच मालाड पोलिस स्टेशनमध्ये पैसे पोहोचतात आणि जे वेळेवर पैसे पाठवत नाहीत.त्यांच्या अनधिकृत बांधकामांच्या नावे तक्रार करून अशा प्रकारे तोडक कारवाई केली जाते हे सिद्ध झाले.कारण जेव्हा हे असे अनधिकृत बांधकाम सुरुवातीलाच का नाही पडले जात.अचानक कारवाई काशिकाय केली जात पालिकेचे हे गौड बंगाल आज पावेतो काही कळलेले नाही. भोवतेक पालिका अधिकाऱ्यांचा सदर कंत्राटदारांकडे रोजचा ससेमिरा चालू असतो. अधिकाऱ्यांनी ठरवलेली रक्कम वेळेवर भरली नाही की,अशी तोडक कारवाई करून दाखवायची हेच ” मोदी सरकारचे अच्छे दिन” आहेत…
बांध काम सुरु कर्णयपूर्वी कोण कोण मलाई रूपी माल खातों त्यांच्या आयुक्त आणि प्रशासन कार्रवाई करण्याचे धाडस करणार का??
Good
Good work but why bmc didn’t acted when it was being built.