
एसएमएस-प्रतिनिधी -मिलन शहा
घाटकोपर पूर्व – भाजपला आज घाटकोपर पूर्व विधानसभेत मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी महामंत्री आनंद कोठावदे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोठावदे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे औपचारिक स्वागत केले. या प्रवेशामुळे घाटकोपर पूर्व परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रसंगी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख सुरेश पाटील, विभागसंघटक प्रज्ञा सकपाळ, तसेच इतर अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंद कोठावदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, “जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेतृत्वासोबत काम करण्याची इच्छा असल्यामुळे मी हा निर्णय घेतला,” असे सांगितले.
घाटकोपरमधील आगामी राजकीय घडामोडींवर या प्रवेशाचा परिणाम दिसून येईल, असे मानले जात आहे.
Ubt मध्ये incoming जोमाने सुरु
सामान्य मतदार जनतेच्या जीवावर मोठे होता एकदा जनतेला तरी विचार भोगाल साल्याहो…