
एसएमएस -प्रतिनिधी- मिलन शहा
मुंबई :संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज हुतात्मा चौक येथे उपस्थित राहून शहीदांना अभिवादन केले. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर हुतात्म्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते-सचिव विनायक राऊत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे तसेच अनेक आमदार, विभागप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हुतात्म्यांच्या स्मृतीदिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या कार्याची आठवण करून देत महाराष्ट्राच्या एकात्मतेचा आणि अस्मितेचा संदेश पुनः दृढ करण्यात आला.
विनम्रअभिवादन
निवडणुकीचे बिगुल वाजले ते वाजले की,या राजकारण्यांना शहीद, हुतात्मे यांची आठवण यायला सुरुवात होते. जो कोणी राजकारणी ऊठ, सुट येतो आणि या हुतात्म्यांच्या स्मृती स्मारकाजवळ येऊन छायाचित्र काढून चमकोगिरी करतो आणि हे ठाकरे त्यातील एक आहेत…वरील शहीद झालेल्या कैक लोकांच्या नावे असलेल्या स्मारकांची तसेच अशाच प्रकारे स्मृती स्थळांची सध्या फार बिकट अवस्था झालेली आहे.त्याकडे या नालायक लोकांचं मुद्दामून कानाडोळा आहे.