एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई : युवक क्रांती दलाचे (युक्रांदचे) खंदे कार्यकर्ते, पुनरुज्जीवीत विचारवेधचे प्रणेते, निर्भय व प्रयोगशील संघटक तसेच पुरोगामी विचारवंत डॉ. आनंद करंदीकर यांचे १८ नोव्हेंबर रोजी निधन झाले. क्रमाक्रमाने बिघडत गेलेल्या फुप्फुसांच्या विकाराशी लढा देत ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले.
त्यांच्या स्मरणार्थ शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता
सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर (पूर्व) येथे आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आनंद करंदीकरांचे सर्व पुरोगामी सहप्रवासी, समविचारी सुहृद व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत —
मधु मोहिते, भालचंद्र गुणगेकर, हुसेन दलवाई, विजया चौहान, शमा दलवाई, रेखा ठाकूर, हेमंत गोखले, विजय नाईक, संजीव चांदोरकर, शैला सातपुते, संध्या नाईक, प्रताप आसबे — करण्यात आले आहे.
ईश्वर चरणी प्रार्थना आत्म्यास शांति लोभों
डॉ. आनंद करंदीकर यांना “. भावपूर्ण श्रद्धांजली .”
विनम्र अभिवादन !!
Rip
Adranjali