
एसएमएस :प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई: राजापूर तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठी घडामोड घडत असून शिंदे गटाचे पदाधिकारी व माजी जिल्हापरिषद सदस्य दिनेश जैतापकर यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे औपचारिक स्वागत केले.
या प्रवेशावेळी जैतापकर यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताकद दाखवली. या प्रवेशामुळे राजापूर तालुक्यातील आगामी स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.
कार्यक्रमास शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख दत्ता कदम तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
पक्षांतरानंतर बोलताना दिनेश जैतापकर म्हणाले, “आम्ही विचाराने, भावनेने आणि आत्म्याने नेहमीच शिवसेनेकडेच होतो. आता पुन्हा आमच्या घरात परत आलो आहोत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा संपूर्ण विश्वास आहे.”
यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “जनतेच्या मनातला आवाज कोणता आहे ते आता स्पष्ट होत आहे. लोक आपल्याकडे परत येत आहेत आणि ही जनता व विचारांची खरी शिवसेना आहे.”
या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला राजापूर परिसरात मोठी ताकद मिळाली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
अबबब है काय चालले आहे
Whatttt?
De dhakka