एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई :जॉय सामाजिक संस्थेच्या वतीने येणाऱ्या २०२६ नूतन वर्षा निमित्त स्वहस्ते भेटकार्ड (ग्रीटिंग कार्ड) तयार करणे स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यासाठी जुन्या टाकावू वस्तू वापरून नवे भेटकार्ड स्वहस्ते तयार करायचे आहे.तसेच आपल्या वडीलांप्रती एखादी चारोळी, ५० शब्दांत भावना किंवा कविता स्वहस्ते लिहून त्याचा त्याच कार्डवर उल्लेख करायचा आहे.कार्ड पाठविण्याची अंतिम तारीख २५ डिसेंबर २०२५ असून आपली कार्ड जॉय सामाजिक संस्था मुंबई, संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे २/१२ पार्वती निवास रामनगर बांद्रेकरवाडी जोगेश्वरी पूर्व मुंबई ४०००६० फक्त कुरिअर आणि स्पीड पोस्टने पाठवायची आहेत.प्रवेश फी शंभर रुपये असून अधिक माहितीसाठी ९९२०५८१८७८ संपर्क करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. प्रथम तीन क्रमांक आणि दोन उत्तेजार्थ क्रमांकाना ट्रॉफी, मेडल सर्टिफिकेट आणि सहभागी स्पर्धकांना मेडल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
Vgood
Nice