एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा पश्चिम विभागच्या संयुक्त विद्यमाने बोरिवलीतील सेंट लॉरेन्स हायस्कूल एक्सर बोरिवली पश्चिम येथे 3 ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कांदिवली बोरिवली व दहिसर विभागातील 65 माध्यमिक शाळा व 20 कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विज्ञान शिक्षक हे सहभागी होणार आहेत.
विज्ञान प्रदर्शनाचा प्रकल्पाचा मुख्य विषय ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम ‘ असा आहे. त्यावर आधारित विज्ञान प्रकल्प बाल वैज्ञानिक मांडणार आहेत.
विज्ञान प्रदर्शनाअंतर्गत भाग घेतलेल्या सहशाले उपक्रमांचे बक्षीस वितरण 4 डिसेंबरल 2025 रोजी होईल.
हे प्रदर्शन सकाळी 10.00 ते 4.00 या वेळेत संपन्न होणार आहे
वार्डमधील विद्यार्थी शिक्षक पालक विभागातील नागरिक यांनी बालवैज्ञानिकांनी तयार केलेल्या प्रकल्प पाहण्यासाठी अवश्य यावे अशी विनंती मुख्य निमंत्रक मुख्याध्यापक सचिन गवळी व सर्व सह निमंत्रकांतर्फे केली आहे.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय डॉक्टर नरेंद्र जी देशमुख (वैज्ञानिक अधिकारी होमी भाभा विज्ञान प्रशिक्षण केंद्र) यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
शिक्षण निरीक्षक संजय जावीर पश्चिम विभाग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन केलेले आहे, सेंट लॉरेन्स बोरिवली पश्चिम शाळेमध्ये याचे उत्तम नियोजन सुरू आहे असे मुख्याध्यापिका विना अल्मेडा यांनी सांगितले.
विद्यार्थीगण हो यशवंत व्हा! गुणवंत व्हा! कीर्तीवंत व्हा!
३ ते ५ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कांदिवली,बोरिवली, दहिसर विभागातील ६५ माध्यमिक शाळा तसेच २० कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विज्ञान शिक्षकांना आमच्या शुभेच्छा!…
Good opportunity to see