“निसर्ग संवर्धनासाठी सीड बॉल उपक्रम उत्साहात”

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई: निसर्ग संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आदर्श विद्यालय, गोरेगाव (प.) येथे मिशन दहा लाख वृक्षारोपण आणि एक कोटी सीड बॉल टॉसिंग उपक्रम राबविण्यात आला. मंगळवार, दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित या उपक्रमात इयत्ता पाचवी ते आठवीतील तब्बल २०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

या उपक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने रिकामे शहाळे आणि थोडी माती सोबत आणली होती. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक अखिल देसाई यांनी उपक्रमाचे महत्त्व आणि त्याची अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांकडून हरडा बियांचे रोपण करून घेण्यात आले.

कार्यक्रमास मुख्याध्यापिका वर्षा शोभणे, पर्यवेक्षिका प्रभावती गडांकुश, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे संस्थेचे माजी विद्यार्थी योगेंद्र सावंत व स्मृती सावंत (एसएससी 1986 बॅच) यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.


Share

5 thoughts on ““निसर्ग संवर्धनासाठी सीड बॉल उपक्रम उत्साहात”

  1. खुप खुप छान उपकरण राबिवला आहे असे कार्यक्रम सर्वाने राबवले पाहिजे

  2. मुलांमधे पर्यावरणाशी थेट नातं जोडणारा उपक्रम.
    शाळेने असे उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला ही खरंच अभिनंदनीय बाब आहे. सध्या सरकारच पर्यावरणाच्या मुळावर उठलं आहे. त्या जमान्यात तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये ही मूल्य रुजवत आहात, ही सकारात्मक गोष्ट आहे.
    वृक्ष दिंडी वगैरे काढणे ठीक आहे.. पण त्याही पुढे जाऊन बीज प्रसार करणे सुद्धा गरजेचे आहे. ते तुम्ही केलंत.
    उपक्रमाला सहाय्य करणाऱ्यांचे सुद्धा अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *