भारतीय मत्स्यहक्कांचा आवाज जागतिक पातळीवर!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई : भारतीय मच्छिमारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) चे अध्यक्ष रामकृष्ण जगन्नाथ तांडेल यांना इंडोनेशियातील प्रतिष्ठित संस्थांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी विशेष आमंत्रण मिळाले आहे.

वर्ल्ड फोरम ऑफ फिशर पिपल्स (WFFP) आणि पिपल्स कोअ‍ॅलिशन फॉर फिशरीज जस्टीस (Koalisi Rakyat untuk Keadilan Perikanan / KIARA) यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान इंडोनेशियातील सुराबाया येथे आशियातील विविध देशांच्या मच्छिमार समुदायांमधील अनुभव, संस्कृती आणि शाश्वत मासेमारी पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश किनारी प्रदेशांतील मच्छिमारांचे जीवन, आव्हाने, परंपरा आणि तंत्रज्ञानाचे आदानप्रदान करून भविष्यातील शाश्वत मासेमारी धोरणे सक्षम करणे हा आहे.

या कार्यक्रमाच्या अखेरीस ७ डिसेंबर रोजी WFFP च्या नियोजन समितीची विशेष बैठक होणार असून, २०२६ साठी जागतिक स्तरावरच्या उपक्रमांची दिशा ठरवली जाणार आहे. रामकृष्ण तांडेल हे या समितीचे अधिकृत सदस्य असल्याने या बैठकीत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

ही माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली.


Share

2 thoughts on “भारतीय मत्स्यहक्कांचा आवाज जागतिक पातळीवर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *