
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली महाडिक यांचे वडील अनंत सोनू महाडिक यांचे वयाच्या ७१व्या वर्षी दीर्घ आजाराने आज पहाटे संतोष नगर, गोरेगाव (पूर्व) येथील राहत्या घरी निधन झाले. सकाळी सुमारे ५.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांची अंत्ययात्रा गोरेगाव पूर्व येथील शिवधाम स्मशानभूमीत संध्याकाळी ५.३० वाजता पार पडली. अंतिम क्रियेदरम्यान नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनंत सोनू महाडिक यांच्या पश्चात मुलगा ओंकार, सून अनिता, मोठी मुलगी वैशाली महाडिक, जावई तसेच नात असा परिवार आहे.
Om Shanti… Let his soul rest in peace…
Rest in peace sir.
भावपूर्ण आदरांजली!!
भावपूर्णआदरांजली
Adranjali
प्रथम,
राष्ट्रसेवा दल (मालवणी),सफल विकास वेलफेअर सोसायटीचे (कुटुंब) पदाधिकारी व सदस्य आम्ही सर्वजण महाडिक कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. कै.अनंत महाडिक(बाबा) यांची आणि माझी ओळख काही नवीन नाही.गेल्या तीन ते चार वर्षांपासून मी या महाडिक कुटुंबाला ओळखतो. त्यातल्यात्यात कै. अनंत महाडिक(बाबा) यांचं स्वरूप अगदी मनमिळावू अशात त्यांच्या स्वभावात देखील प्रेमाचा धाक होता.त्यांच्या व्यवक्तिक जीवनाबद्दल जास्त माहिती नसून त्याचं कष्ट मात्र,जगण्या पलीकडचं होतं.ते गेले हे कळताच शेजारील तसेच परिसरातील नागरिकांनी व मित्र परिवाराने साश्रूनयनांनी त्यांना सर्वांनी निरोप दिला. बाबांसारखा माणूस होणे पुन्हा नाही एवढं मात्र नक्कीच!….
पुन्हा एकदा बाबा आपणास ” भावपूर्ण श्रद्धांजली “