एसएमएस. प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : मुंबई सह देशभरातील हजारो इंडिगो प्रवाशांना मागील तीन दिवसापासून प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. आपल्याच विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले तासंतास रांगेत उभे होते, त्यांना कोणतीही माहिती नव्हती, मार्गदर्शन नव्हते आणि पिण्याचे पाणी किंवा अन्नही नव्हते. इंडिगो विमानसेवेचा झालेला बट्टाबोळ हे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे अपयश असून या सर्व घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मुंबई विमानतळावर जाऊन खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, देशभरातील विमानसेवा विस्कळीत झाल्याने त्याचा मोठा फटका विमान प्रवाशांना झाला. विमान कंपनीकडून कोणत्याही प्रकारची सुचना वा माहिती दिली जात नव्हती. याचा फायदा उठवत काही विमान कंपन्यांनी ५ हजार रुपयांच्या तिकीटासाठी ५० ते ६० हजार रुपये दर लावून प्रवाशांना लुटले. विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागले. हा सर्व गोंधळ होत असताना सरकार म्हणून काहीही दखल घेतली गेली नाही हे अत्यंत गंभीर आहे.
ज्या प्रवाशांना असह्य त्रास झाला त्याची भरपाई इंडिगो व भारत सरकार कशी करून देणार आहे, असा प्रश्न विचारून ही विमानसेवा पूर्णपणे कोलमडली त्याची जबाबदारी निश्चित करा. ऑपरेशनल अपयशांची सखोल चौकशी आणि सुधारणात्मक उपाययोजना करा जेणेकरून कोणतीही विमान कंपनी पुन्हा नागरिकांना ओलीस ठेवू शकणार नाही, असेही खासदार वर्षा एकनाथ गायकवाड म्हणाल्या.
जे वहां जे वहां निवडणूका होणार असेच जनतेचे हाल होणार जनता कधी समजनार देव जाने