एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई :संस्कारक्षम वयातच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे दरवर्षी विभागवार आतरशाल`य विज्ञान प्रदर्शन भरवले जाते. शिक्षण निरीक्षक कार्यालय, मुंबई पश्चिम विभाग अंतर्गत के / पी पूर्व विभागाचे विज्ञान प्रदर्शन यावर्षी अंधेरी पूर्व येथील सेंट अरनॉल्ड हायस्कूल येथे शाळेत दिनांक 10, 11 व 12 डिसेंबर या काळात आयोजित केले आहे. प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम (STEM ) हा असून त्या अंतर्गत शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता तसेच जलसंवर्धन व व्यवस्थापन इत्यादी उपविषय निश्चित केले आहेत. दरवर्षी विद्यार्थी, शिक्षक तसेच विज्ञान प्रयोगशाळा सहायक यांच्या उत्पूर्त प्रतिसादात ही प्रदर्शने संपन्न होतात. विद्यार्थी व शिक्षकांमधील नाविन्मपूर्ण कल्पनांना या प्रदर्शनात मोठी संधी मिळत असते, सर्वोत्कृष्ट प्रकल्प विभागीय तसेच राज्जा पातळीसाठी निवडले जातात. यावर्षी या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जोष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जयराम यांच्या हस्ते होणार असल्याचे पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांनी सांगितले. तसेच आमदार मुरजी पटेल, मुंबई विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाच्या माजी अधिष्ठाता डॉ. अनुराधा मुजुमदार, विद्या प्राधिकरणाच्या प्राचार्या मनिषा पवार, जवाहर बालभवन, मुंबईच्या संचालिका नीता पाटील, बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अच्युतराव माने है मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर स्क्रैरिया पन्नकल असणार आहेत. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी एस.एस.सी. सी.बी.एस.ई, आय.सी. एस. ई बोर्डाच्या तसेच मुंबई महापालिका शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन के / पी पूर्व विभागाच्या मुख्य निमंत्रक मिनल सरकाळे यांनी केले आहे.
Thatsnice