
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई – राष्ट्र सेवा दलाच्या संविधानिक मुल्यांच्या प्रचार प्रसाराला साने गुरुजींच्या मानवी मुल्यांचे अधिष्ठान असणे आवश्यकच आहे, असे मत पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष हसन देसाई यांनी व्यक्त केले.
अमोल पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुनिल स्वामी यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली. महात्मा जोतिबा फुले आणि साथी सदानंद वर्दे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. सुरुवातीला ताराबाई गर्ल्स हायस्कूलच्या मुलींनी महिलामुक्तीचा संदेश देणारे आशयगर्भ पथनाट्य सादर केले. साथी सदानंद वर्दे यांचा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला.
महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाला खरा शिक्षक दिन मानून इचलकरंजी परिसरातील गुणवंत शिक्षक आणि सेवकांना सन्मानपत्र आणि ग्रंथभेट देवून सन्मानित केले.
यामध्ये गुणवंत शिक्षक
१) आरती लाटणे (जि प यड्राव )
२) पंडित कांबळे , ( DKTE हायस्कूल, मराठी माध्यम)
गुणवंत सेवक
३) स्वाती उमेश डंबाळ (आदर्श विद्यामंदिर)
४) प्रशांत याकोब आवळे ( ताराबाई गर्ल्स हायस्कूल )
तसेच साने गुरूजी सांस्कृतिक युवा मंचवतीने दिले जाणारे साने गुरूजी प्रेरणा पुरस्कार २०२५ देखील प्रदान केले. त्याचे मानकरी
१) नीता आवळे (डॉ बाबासाहेब आंबेडकर शेती व विकास संशोधन संस्था )
२) प्रथमेश ढवळे (राष्ट्र सेवा दल )
३) नम्रता कांबळे – (स्मिता पाटील कलापथक)
४) कोमल माने (संविधान संवादक)
याचसोबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती इचलकरंजीवतीने शिक्षकांसाठी दिला जाणारा जागर पुरस्कार विनायक सार्शा, अब्दुल लाट यांना प्रदान करण्यात आला.
प्रमुख अतिथी तथा आंतरराष्ट्रीय ओडिसी नृत्यांगना साथी झेलम परांजपे यांनी इचलकरंजीतील या सामाजिक कामाचे शिलेदार असलेल्या तरुणाईचा सत्कार करताना तुम्ही परिवर्तनाची ही पताका अशाचप्रकारे फडकत ठेवण्याचा संदेश आपल्या मनोगतामध्ये दिला.
समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी अनिल होगाडे, जयप्रकाश जाधव, महावीर कांबळे, विनायक होगाडे, नौशाद शेडबाळे, ललित बाबर , इंद्रायणी पाटील, दामोदर कोळी, शरद वास्कर, विनया चनगुंडी, स्नेहल माळी, अशोक वरुटे, रुचिता पाटील, रेशमा खाडे, सुनिल कोकणी आदिंसह सेवादल कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय रेंदाळकर यांनी सूत्रसंचालन केले तर रोहित दळवी यांनी आभार मानले.
Congratulations
Chhan
Very good