
एसएमएस-प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
मुंबई :समाजवादी चळवळीतील दोन ज्येष्ठ मार्गदर्शकांची आठवण जपण्यासाठी केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि स्वातंत्र्यसेनानी पन्नालाल सुराणा यांचे २ डिसेंबर २०२५ रोजी तर कष्टकऱ्यांचे नेते, कृतिशील विचारवंत बाबा आढाव यांचे ८ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाच्या स्मरणार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
ही अभिवादन सभा गुरुवार, दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, आरे रोड, गोरेगाव (प.) येथील गोविंद दळवी सभागृहात होणार आहे. समाजवादी परंपरेत काम करणाऱ्या सर्वांनी या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Good
समाजा साठी खुप सारे योगदान दिले आहे या थोर वंतानी असे हे थोर पन्नालाल सुराणा आणि कृतिशील विचारवंत बाबा आढाव याना माझा मना पासुन नमन
विनम्रअभिवादन
Rip