दानवेंचा गौप्यस्फोट! पैशांनी भरलेली बॅग व्हायरल..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई : राज्यात आज सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे—विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या पैशांनी भरलेल्या बॅगेच्या ट्विटची! दानवे यांनी ट्विटद्वारे विचारलेलं प्रश्नचिन्ह—“ही बॅग कोणत्या आमदाराची?”—यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तपासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेली बॅग ही आ. महेश दळवी यांची असल्याचे दिसून येत आहे. दळवी यांच्या नावासोबत त्यांचा फोटोही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फिरत आहे.

या प्रकरणावर अंबादास दानवे यांनी सरकारवर तिखट हल्ला चढवत विचारलं—

“शेतकऱ्यांसाठी, सरकारी योजनांसाठी सरकारकडे पैसे नाही म्हणतात… मग असे पैशांचे ढीग येतात कुठून?”

यानंतर महेश दळवी यांनीही दानवे यांच्यावर जोरदार पलटवार करत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले—

“दानवे यांना आता कोणतेही काम उरलेले नाही! अधिवेशनापूर्वी मुद्दाम ‘गरम विषय’ निर्माण करण्यासाठी हे नाटक केलं जातंय. ट्विट करण्यापूर्वी शहानिशा करायला हवी होती.”

दळवी यांनी दानवे यांना खुलं आव्हान दिलं असून हा विषय ते नागपूर अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले आहे.

राज्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने, पैशांच्या बॅगेचा मुद्दा आता अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. या घटनेने राजकीय वातावरणावर प्रश्नचिन्ह तर निर्माण केलंच, पण अनेकांना धक्का दिला आहे.

शेवटी एक म्हण इथे नेमकी लागू पडते—

“जब खैरात लगि बटने, तो लगा कलेजा फटने;
जब दिल लगा फटने, तो ऊपरवाला याद आया.”

सध्या ही म्हण भाजपा आणि दाढी गटावर अचूक बसते, अशी चर्चा राजकीय पडद्यामागे रंगू लागली आहे.


Share

2 thoughts on “दानवेंचा गौप्यस्फोट! पैशांनी भरलेली बॅग व्हायरल..

  1. फार वाईट परिस्थिती आहे सर्विकडे भ्रष्टाचार पसरलेला आहे

  2. अशा पैशांचा (पैशांची बॅग)ढिगारा असो किंवा सरकारी योजनेचा लाभ,सर्व पैसे सामान्य मतदार जनतेच्या कररूपातून व्यवहार आहे हा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *