बोरिवलीत तनिष्कचा सुसज्जित भव्य स्टोअर पुन्हा सुरू.

Share

एसएमएस -प्रतिनिधी –वैशाली महाडिक

मुंबई : टाटा समूहाच्या तनिष्क या भारतातील आघाडीच्या दागिन्यांच्या किरकोळ ब्रँडने मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे आपला नूतनीकरण केलेला भव्य स्टोअर मोठ्या उत्साहात पुन्हा सुरू केला. एल. टी. रोडवरील विनी एलिगन्स इमारतीत असलेला हा स्टोअर आधुनिक व आकर्षक रचनेने सजविण्यात आला आहे.

सकाळी ११.३० वाजता झालेल्या उद्घाटन समारंभात तनिष्कचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट (रिटेल) सुनील राज तसेच टायटन कंपनी लिमिटेडचे पश्चिम विभागीय व्यवसाय प्रमुख राम प्रभात यादव यांच्या हस्ते स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तनिष्कचे पश्चिम विभागीय व्यवसाय व्यवस्थापक विनोद सिंग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

१८ हजार चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या स्टोअरमध्ये सोने व हिऱ्यांचे दागिने, सॉलिटेअर्स, हलक्या वजनाचे आणि आधुनिक डिझाइन्सची समृद्ध श्रेणी उपलब्ध आहे. ‘रेडियन्स इन रिदम’, ‘मृगांका’, ‘एलाॅन’, ‘रिवाह’, ‘अवीर’ तसेच ‘मिया बाय तनिष्क’ हे विशेष संग्रह येथे ग्राहकांना पाहायला मिळत आहेत.

या पुनर्उद्घाटनानिमित्त तनिष्ककडून विशेष ऑफर जाहीर करण्यात आली असून, सोन्याच्या दागिन्यांवर प्रति ग्रॅम ६०० रुपयांपर्यंत सूट, हिऱ्यांच्या किमतीवर २० टक्क्यांपर्यंत सूट तसेच जुन्या सोन्याच्या देवाणघेवाणीवर ० टक्के कपात देण्यात येत आहे. ही ऑफर १९ ते २२ डिसेंबर २०२५ दरम्यान वैध आहे.

ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शकता अधिक दृढ करण्यासाठी स्टोअरमध्ये तनिष्क डायमंड एक्सपर्टाइज सेंटर सुरू करण्यात आले असून, त्यामार्फत हिऱ्यांची शुद्धता व गुणवत्ता तपासण्याची आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


Share

2 thoughts on “बोरिवलीत तनिष्कचा सुसज्जित भव्य स्टोअर पुन्हा सुरू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *