
एसएमएस-प्रतिनिधी-मिलन शहा.
मुंबई : वांद्रे पूर्व येथील प्रभाग क्रमांक ९४ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)–महाराष्ट्र नवनिर्माण सेना–राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या अधिकृत उमेदवार प्रणा भुतकर यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आज शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या उद्घाटनप्रसंगी शिवसेना नेते व आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, तेजस ठाकरे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह युतीचे विविध पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नेत्यांनी प्रभागातील विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि पारदर्शक कारभारासाठी युती कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९४ मध्ये युतीचा विजय निश्चित असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Thackreys getting good people