
एसएमएस-सोमा डे.
मुंबई :राष्ट्र सेवा दल, मालवणी, काचपाडा तसेच सफल विकास वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांची जयंती केक कापून उत्साहात साजरी करण्यात आली. मालवणीतील सफल लर्निंग सेंटर येथे आयोजित या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि संघर्षाचा आढावा घेण्यात आला.
या कार्यक्रमात विध्यार्थिनी अदरीजा बाबू डे व फवाद मुदस्सर सय्यद यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याची व सामाजिक संघर्षाची माहिती उपस्थितांना दिली. सिद्धेश्वरी शर्मा यांनी “सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज आम्ही शिक्षण घेऊ शकतो,” असे प्रतिपादन केले. तर अंजली बाबू डे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी शिक्षिका फातिमा बी. शेख यांच्या शिक्षण क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबाबत सविस्तर माहिती दिली.

सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास वैशाली महाडिक, सोमा डे, रेखा कोटक, वीणा धर्माधिकारी, सावित्री पोद्दार, कृष्णा वाघमारे, तौहिद शेख, मुस्कान पोद्दार, प्रथमेश पोद्दार, एन. एस. सय्यद, नीलम शिंदे, राजेश, अलिझा शेख, झोया शेख, फिझा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
Very nice.
खर तर या युगात खुप कमी लोकाना माहिती आहे आहे कि महिलाना शिक्षित करणयात मोलाचा मोठा वाटा आहे ते सावित्री बाई फुले यांचा हे लोकाना पटवून देणे हे हि फार मोठे काम आहे जे सफल विकास वेलफेयर करत आहे
Happybirthdayसावित्री माई….
Khup chan
Great initiative