पनवेल शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवकांचा मातोश्री वर सत्कार.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई :पनवेल महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा आज शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यामध्ये नगरसेविका प्रगती कैलास पाटील, लीना अर्जून गरड, आर्या प्रविण जाधव, मेघना संदिप घाडगे, रितिक्षा विनय गोवारी, प्रिया सुनिल गोवारी तसेच नगरसेवक उत्तम मोर्बेकर यांचा समावेश होता.
या प्रसंगी शिवसेना नेते अनंत गीते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते बबन पाटील, शिवसेना उपनेते बाळ माने, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल शहराच्या विकासासाठी जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरत लोकहिताचे कार्य प्रामाणिकपणे करावे, असे मार्गदर्शन मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना केले.


Share

3 thoughts on “पनवेल शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवकांचा मातोश्री वर सत्कार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *