
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे.
मुंबई : उत्तर मुंबईत शाळा व खाजगी स्कूल वॅनमधून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, बेकायदेशीर व नियमबाह्य विद्यार्थी वाहतुकीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ), उत्तर मुंबई जिल्ह्याने प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आरपीआय (अ) उत्तर मुंबई जिल्ह्याचे सचिव विनोद पांडुरंग घोलप यांनी अप्पर पोलीस आयुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) यांना निवेदन देत मालाड, गोरेगाव, कांदिवली व बोरिवली परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर स्कूल वॅनकडे लक्ष वेधले.
अनेक वॅनमध्ये चालक व अटेंडंटची पोलीस पडताळणी नसणे, महिला अटेंडंटचा अभाव, परवाना व परमिटशिवाय वाहतूक, तसेच फिटनेस सर्टिफिकेट, जिपीएस, स्पीड गवर्नर (Fitness Certificate, GPS, Speed Governor) नसल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकार मोटार वाहन कायदा व पोकसो (POCSO) कायद्याचे उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले.
नियमभंग करणाऱ्या स्कूल वॅनवर तात्काळ कारवाई, वाहन जप्ती, महिला अटेंडंट सक्ती व निष्काळजी शाळा व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी आरपीआय (अ)कडून करण्यात आली आहे.
Goodwork
Jald se jald karwaai kiya jye.
मना पासुन आभार व्यक्त करतो खुप सुन्दर मुलानी मेहनत केली आहे
हो खरी गंभीर गोष्ट आहे पण खरतर काहीच होत नाही सर्व भ्रष्टाचार पसरलेला आहे