महिला महाविद्यालयात ‘बोलींचा जागर’..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई : मालाड येथील जनसेवा समिती संचालित श्री. एम.डी. शाह महिला कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स  येथे महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचलनालयाच्या विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘निमित्ताने ‘बोलींचा जागर’ हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहात आणि जल्लोष साजरा करण्यात आला. मराठी भाषा ही विविध बोलीनी नटलेली समृद्ध व संपन्न भाषा आहे. मराठीच्या विविध बोली या मराठी भाषेचे वैभव आहेत. बोलीभाषा ही महाराष्ट्राच्या विशिष्ट प्रदेशात व भागात बोलली जाणारी मराठी प्रादेशिक अभिव्यक्ती आहे. मराठी भाषेच्या या विविध बोलींचे जतन संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ या निमित्ताने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ‘बोलींचा जागर’ या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मालाड येथील श्री एम.डी. शाह महिला कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स या महाविद्यालयात दिनांक २१ रोजी,  ‘बोलींचा जागर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रंथदिंडी, शोभायात्रा, लोककलावंतांचे सादरीकरण, बोलीबाबत विद्यार्थिनींचे सादरीकरण, बोली विषय तज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी असे विविध कार्यक्रम आयोजित करून ‘बोलींचा जागर’ हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.



Share

2 thoughts on “महिला महाविद्यालयात ‘बोलींचा जागर’..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *