‘महानगर, महापालिका आणि नागरिक’ विषयावर गोरेगावात चर्चा..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले.

मुंबई :केशव उर्फ बंडू गोरे यांच्या ६७ व्या स्मृतिदिनानिमित्त केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महानगर, महापालिका आणि नागरिक’ या महत्त्वपूर्ण विषयावर सोमवार, दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
गोरेगाव (पश्चिम) येथील आरे रोडवरील केशव गोरे स्मारक ट्रस्ट सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. मुंबईसारख्या महानगराचा विस्तार, महापालिकेची कार्यपद्धती आणि त्यामधील नागरिकांची भूमिका या त्रिसूत्रीवर यावेळी सखोल चर्चा होणार आहे.
या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉ. मृदुल निळे आणि ज्येष्ठ पत्रकार अभिजीत करंडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. महानगराच्या जडणघडणीत प्रशासकीय यंत्रणेसोबतच सजग नागरिक म्हणून आपली भूमिका काय असावी, यावर ते मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला गोरेगाव व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केशव गोरे स्मारक ट्रस्टचे विश्वस्त व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Share

4 thoughts on “‘महानगर, महापालिका आणि नागरिक’ विषयावर गोरेगावात चर्चा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *