मराठी भाषा दिनानिमित्त अभिजात पुस्तक प्रदर्शन.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाचकप्रेमिना पर्वणी ठरतील अशा अभिजात पुस्तकांचे प्रदर्शन आणि अभंग रिपोस्ट या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन मनसेच्या वतीने करण्यात आले असून याचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजीपार्क येथे दरवर्षी पुस्तक प्रदर्शनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत यावर्षीही छत्रपती शिवाजीमहाराज पार्क मैदानात 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता विविध वर्तमानपत्राचे ज्येष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत पुस्तक प्रदर्शनाचे उदघाट्न करण्यात येणार आहे तर 27  फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता अभंग रिपोस्ट या अनोखा कार्यक्रम होणार आहे.

पुस्तक प्रदर्शनात 92 प्रकाशकांची हजारो पुस्तके, कादंबरी, वागमय, पौराणिक कथा संग्रह ऐतिहासिक पुस्तके वाचकप्रेमिना पाहायला मिळणार असून हे प्रदर्शन 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत दुपारी 1 ते सायंकाळी 9 पर्यंत खुले राहणार आहे.

त्याचप्रमाणे पारंपरिक अभंगांना आधुनिक संगीताच्या चौकटीत नव्याने सादर करत तरुणाईत भक्तीचा स्वर गुंजवणारा वारकरी संप्रदायातील संतकाव्य आणि समकालीन वाद्यसंगीत यांचा सुरेख संगम असलेला ‘अभंग रिपोस्ट’ हा नवा फ्युजन बँड मनसे घेऊन येत असून या अभिनव उपक्रमाचा आस्वाद रसिकाना अनुभवता येणार आहे. 

‘अभंग रिपोस्ट’ हे संतांच्या अभंगांचे रॉक, सूफी, फोक आणि इंडी फ्युजन शैलीत सादरीकरण करणारे आहे तसेच पारंपरिक भक्तीभाव जपत आधुनिक साउंड डिझाइनची जोड देत ते अभंगांना नव्या धाटणीने सादरिकरण करतात. त्यांच्या लाईव्ह परफॉर्मन्स ऊर्जावान आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे प्रेक्षकाना एक नवा अनुभव मिळणार आहे.

या बँडचा मुख्य उद्देश म्हणजे अभंगांची परंपरा तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे. संत साहित्याची गूढता आणि आजच्या काळातील संगीतभाषा यांचा सेतू बांधून ‘अभंग रिपोस्ट’ आध्यात्मिकता आणि आधुनिकता यांचा संतुलित मिलाफ घडवणारा असाच आहे असे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

फक्त गाणी सादर करण्यापुरते मर्यादित न राहता, भक्तीपर परंपरेला नवा आयाम देण्याचा या बँडचा प्रयत्न आहे. परंपरा आणि नवकल्पना यांचा समर्थ संगम साधत ‘अभंग रिपोस्ट’ अभंगांना नव्या पिढीसाठी जिवंत आणि सुसंगत ठेवण्याचे कार्य करणारे ठरणार आहे


Share

One thought on “मराठी भाषा दिनानिमित्त अभिजात पुस्तक प्रदर्शन.

  1. मराठी भाषा ही अस्मिता,गौरव आणि अभिमान आहे प्रत्येक मराठी माणसाचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *