पश्चिम मुंबईत ४० लाखांचे एमडी जप्त.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई :दिनांक ५ मार्च २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे दा. नौ. नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने जोगेश्वरी पश्चिम येथील आंबोली परिसरातील मेमन कॉलनी येथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान फौजान अली अहमद तिकीटवाला (वय ३३), रा. रूम क्र. E/21, मेमन कॉलनी, फारुख हायस्कूलजवळ, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई याच्या घरातून ८०० ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १९४/२०२६ नोंद करण्यात आली असून एनडीपीएस अॅक्ट १९८५ च्या कलम ८(क), २२(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दा. नौ. नगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. परमजित दहिया, पोलीस उपायुक्त श्री. दिक्षीत गेडाम (परिमंडळ ९) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती कल्पना गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंदर आणि पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीत घाडगे, पो. हवालदार संजय हळदे, बिपीन गायकवाड, मंगेश चव्हाण, मंगेश रांजणे, विनोद गायकवाड, तसेच पोलीस शिपाई धनाजी पांढरे, शशिकांत बांगर, प्रधान व महिला पोलीस शिपाई चंद्रकला गारे यांनी ही यशस्वी कारवाई केली


Share

One thought on “पश्चिम मुंबईत ४० लाखांचे एमडी जप्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *