प्रा.डॉ.एन.डी.पाटील विद्यालयात बालक-पालक मेळावा…

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयात 28 मार्च रोजी भव्य बालक-पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पालकांच्या सक्रिय सहभागातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प विद्यालयाने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयातील सादरीकरण, स्किट तसेच PPTच्या माध्यमातून विविध प्रकल्प सादर करत आपली कौशल्ये आत्मविश्वासाने मांडली. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या या गुणदर्शनाचा मनापासून आनंद घेतला.
यावेळी विद्यालयाच्या प्रगतीसाठी सहकार्य करणाऱ्या संस्था व मान्यवरांचा पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसेच ‘मिशन ग्रीन’ संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पर्जन्य जल संधारण व्यवस्था (Rain Water Harvesting System) आणि कचरा व्यवस्थापन प्रणाली (Waste Management System) यांचे उद्घाटन करण्यात आले. प्रसिद्ध पर्यावरणवादी शुभाजित मुखर्जी यांनी या प्रणाली विद्यालयासाठी तयार करून दिल्या असून त्यांचे उद्घाटन आमदार योगेश सागर यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाला नगरसेवक दीपक तावडे, नगरसेविका दक्षता कवठनकर, मनोज चव्हाण, संस्था जनरल बॉडी सदस्य प्रशांत पाटील, संगीताताई पाटील, मदनराव चव्हाण, अश्विनी फडतरे, माजी विद्यार्थी संघटना सदस्य तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
पालक, विद्यार्थी आणि हितचिंतक यांच्या सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. या मेळाव्यामुळे पालक-विद्यालय संवाद अधिक दृढ झाला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित झाली.


Share

2 thoughts on “प्रा.डॉ.एन.डी.पाटील विद्यालयात बालक-पालक मेळावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *