४ व ५ एप्रिल ला पुण्यात राष्ट्र सेवा दलाचा निर्धार मेळावा..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

  • महाराष्ट्रभरातून ५०० सक्रिय कार्यकर्ते सहभागी होणार
  • विविध क्षेत्रांतील मान्यवरांचं मार्गदर्शन


मुंबई : राष्ट्र सेवा दल संघटनेच्या क्रियाशील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा ४ व ५ एप्रिल २०२६ रोजी साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्म द्विशताब्दी वर्ष तसंच महाडच्या चवदार तळ्याच्या संघर्षाची शताब्दी ही या मेळाव्याची पार्श्वभूमी आहे. राज्य आणि देशातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून संविधान मुल्ल्यांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा निश्चित करण्याबाबत धोरणात्मक चर्चा होईल.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकशाही चळवळींमध्ये अग्रणी भूमिका बजावणाऱ्या राष्ट्र सेवा दलाने महाराष्ट्रात अनेक जनआंदोलने उभी केली असून विविध क्षेत्रांतील नेतृत्व घडवले आहे. बदलत्या राष्ट्रीय परिस्थितीत संघटनेला नव्या जोमाने उभारी देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ‘गांधी टॉक’ या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण होणार असून दिग्दर्शक किशोर बेळेकर यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ध्वजारोहण व उदघाटन समारंभ पार पडेल. या मेळाव्याचे उदघाटक म्हणून सचिन गोस्वामी उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘आजचा आणि पुढचा भारत’ या विषयावर मार्गदर्शनासाठी प्रा. डॉ. अजय गुडावर्थी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ तसंच विवेक सावंत यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.

विविध विषयांवर गटचर्चा करून त्यावर सादरीकरण करून पुढील दिशा ठरवली जाईल. सायंकाळी समारोपाने मेळाव्याची सांगता होईल. या मेळाव्यास राज्यभरातून किमान ५०० क्रियाशील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती या मेळाव्याचे प्रमुख प्रकाश कांबळे यांनी दिली आहे. राष्ट्र सेवा दल पुणे जिल्ह्याच्या वतीने संजय गायकवाड, विलास किरोते, अश्विनी सातव आणि मनिषा पाटील हे आयोजनात सहभागी आहेत.

अधीक माहिती साठी संपर्क – 9881191363


Share

One thought on “४ व ५ एप्रिल ला पुण्यात राष्ट्र सेवा दलाचा निर्धार मेळावा..

  1. यंदाचा मेळावा यशस्वी होईल हीच अपेक्षा!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *