मालाड पूर्वेतील इमारतीला भीषण आग..

Share

एसएमएस-प्रतिनिधी -मिलन शहा.

मुंबई : मालाड पूर्वेतील पोद्दार रोड परिसरातील जुने संजीवनी रुग्णालयाजवळील ईश्वर भुवन इमारतीत गुरुवारी उशिरा रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग रात्री सुमारे ११.३५ वाजण्याच्या सुमारास लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस व इतर यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. काही रहिवासी इमारतीत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, लगतच्या इमारतींची छते एकमेकांशी जोडलेली असल्याने अनेक नागरिकांनी छतावरून शेजारच्या इमारतीत जाऊन स्वतःचा बचाव केल्याची माहिती समोर आली.
अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.


Share

One thought on “मालाड पूर्वेतील इमारतीला भीषण आग..

  1. भीषण आगीचे सत्र दिवसेंदिवस सुरू असताना देखील नागरिक काळजी घेताना दिसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *