
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
आक्सा चौपाटी येथे फिरण्यासाठी आलेल्या ३२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. इब्राहम रहीम शेख असे मृत तरुणाचे नाव असून तो कांदिवली पूर्व येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहम शेख हा आपल्या पत्नी व मित्रांसोबत आक्सा चौपाटीवर फिरण्यासाठी आला होता. त्याला पोहता येत असल्याने तो समुद्राच्या पाण्यात गेला व काही वेळाने बाहेर आला. त्यानंतर तो पुन्हा गुडघाभर पाण्यात जाऊन बसला होता. काही वेळाने तेथे पोहत असलेल्या मुलांना तो संशयास्पद अवस्थेत दिसून आला. त्यांनी तत्काळ त्याला पाण्याबाहेर ओढून आणले.
घटनेची माहिती मिळताच तेथील जीवरक्षक अमोल ननावरे, नथुराम सूर्यवंशी, राहुल ठाकुर, केतन भांजी, नागरी संरक्षण दलाचे राहुल रणदिवे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी इब्राहम याला ऑक्सिजन देत सीपीआर सुरू केले. त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
मृत इब्राहम रहीम शेख (वय ३२) हा कांदिवली पूर्व, हनुमान नगर, वडारपाडा रोड क्रमांक २, वाल्मिकी सोसायटी, दहावा मजला, रूम क्रमांक १००५ येथे राहत होता.
Sad