
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मानव विकास संस्थेच्या वतीने १५० छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. हा उपक्रम वर्ली येथील न्यू बिल्डिंग टेलिफोन एक्स्चेंजजवळ आयोजित करण्यात आला होता.
पावसाच्या मोस्मात दिव्यांग नागरिकांना सुरक्षित प्रवास, आरोग्याचे संरक्षण आणि दैनंदिन कामकाज सुलभ व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. लाभार्थींनी संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.
यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजातील गरजू व दिव्यांग बांधवांच्या पाठीशी कायम उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. मानव विकास संस्था भविष्यातही अशा समाजोपयोगी आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Good work