
एसएमएस प्रतिनिधी -सोमा डे
मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी गेट क्रमांक १ येथील मुख्य पदपथावर खासगी विकासक अकवा रोज या विकासकाच्या इमारती चे बांध काम सुरु आहे येथील कामगारांकडून चौथरा तोडून त्याचे डेब्रिज टाकण्यात येत असल्याने संपूर्ण पदपथ डेब्रिजने व्यापला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथ सोडून जीव मुठीत धरत रस्त्यावरून चालावे लागत आहे.
विशेष म्हणजे, हा परिसर मार्वे रोड आणि शहीद अब्दुल हमीद रोडच्या जंक्शनवर आहे. मार्वे रोडवरून शहीद अब्दुल हमीद रोडकडे वळताना बेस्ट बसला याच ठिकाणाहून वळण घ्यावे लागते. अरुंद रस्ता, अनधिकृत वाहनांची पार्किंग आणि पदपथावरील डेब्रिज यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
या समस्येबाबत नागरिकांनी पी-उत्तर विभागाच्या पालिका प्रशासनाकडे तसेच ऑनलाइन तक्रारी करूनही अद्याप कारवाई झालेली नाही. पालिका प्रशासन नेमके दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पदपथावरील डेब्रिज तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
Verydangerousbmc??