एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे
सफल विकास वेलफेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दल, मालवणी, काचपाडा चा संयुक्त उपक्रम; महिला व विद्यार्थ्यांकडून संविधानातील तरतुदींची सोप्या भाषेत माहिती
मुंबई : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून सफल विकास वेलफेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दल, मालवणी-काचपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राष्ट्र सेवा दल, मालवणी क्रमांक २/३, नीलम स्टुडिओच्या बाजूला येथे होणार आहे.
या कार्यक्रमात सोमा डे, सिद्धेश्वरी मयेकर शर्मा आणि नाझिश नाझ या गृहिणी तसेच सफल लर्निंग सेंटरचे विद्यार्थी ‘भारतीय संविधान आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय संविधानातील विविध कलमे, तरतुदी आणि नागरिकांचे अधिकार यांची माहिती सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या आणि बोलचालीच्या भाषेत देण्यात येणार आहे.
संविधानातील मूलभूत बाबींची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि लोकशाही मूल्यांची समज वाढावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सफल विकास वेलफेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दल, मालवणी-काचपाडा यांच्या वतीने वैशाली महाडिक यांनी केले आहे.