वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक धमाका! २८ चेंडूंत शतक, ५२ चेंडूंत द्विशतक..

Share

एसएमएस -प्रतिनिधी – मिलन शहा

यूएईविरुद्ध ५३ चेंडूंत नाबाद २०४ धावांची खेळी; इंडिया एचा ७ गडी राखून दणदणीत विजय.

मुंबई : भारतीय क्रिकेटचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या १५ वर्षांच्या वैभवने मंगळवारी यूएईविरुद्ध राइजिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेत ऐतिहासिक खेळी साकारली. त्याने अवघ्या २८ चेंडूंत शतक, तर ५२ चेंडूंत द्विशतक पूर्ण केले. ५३ चेंडूंत २०४ धावा करताना त्याने २८ षटकार आणि सात चौकारांची आतषबाजी केली.

वैभवच्या या वादळी खेळीच्या जोरावर इंडिया ए संघाने यूएईने दिलेले २५० धावांचे लक्ष्य अवघ्या १४.२ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. त्यामुळे इंडिया एने सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

यापूर्वी यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत नऊ गडी गमावून २४९ धावा केल्या होत्या. हरप्रीत सिंह भाटिया याने १२ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १३० धावांची शानदार खेळी केली. मात्र, वैभवच्या आक्रमक फलंदाजीसमोर यूएईचे आव्हान फिके पडले. अवघ्या १५ वर्षांच्या या युवा खेळाडूने आपल्या खेळीतून भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील मोठी आशा दाखवून दिली आहे.


Share

One thought on “वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक धमाका! २८ चेंडूंत शतक, ५२ चेंडूंत द्विशतक..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *