
प्रतिनिधी:प्रकाश जैस्वार
मुंबई,फॉरेन लॅनग्वेज ऑलिम्पियाड असोसिएशन च्या वतीने आयोजित जर्मन भाषा परीक्षेत मुंबई ची ईशा निसार अली सय्यद मुंबई जिल्हात प्रथम.
खारोडीतील सेंट ज्यूड्स इंग्लिश हाय स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नववी कक्षेत शिकणारी विद्यार्थिनी ईशा निसार अली सय्यद ही ने आठवी ते दहावी च्या गटात जर्मन भाषेच्या पहिल्या लेव्हल च्या परक्षेत मुंबई जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावले तर राज्यात आणि देशाच्या पातळीवर तिने नववे क्रमांक मिळवून पहिल्या दहा मध्ये तिने आपला स्थान मिळवले.तिच्या या कारकिर्दीने पालकांचा आणि शिक्षकांचा समाजात मान उंचावली आहे. तिच्या या कामगिरी चे सर्वच थरातून कौतुक होत आहे.आता ईशा लेव्हल 2 च्या तयारी ला जोमाने लागली आहे.येणाऱ्या डिसेंम्बर महिन्यात लेव्हल 2 ची परीक्षा होणार आहे.घरात आणि कुटुंबियात कोणा ला ही जर्मन भाषेचं ज्ञान नाही.फक्त आपल्या जिद्दीने तिने हे स्थान मिळवल्याने ती आनंदी आणि उत्साही आहे.