
प्रतिनिधी:कांचन जांबोटी
मुंबई,शासन निर्णय काढणं हा सरकारचा अधिकार आहे. त्यावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही असं मत मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी वक्त केले आहे.
मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री अस्लम शेख पुढे म्हणाले की, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अजेंड्या व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामागे उभे आहोत. पण काही अदृष्य शक्ती हे सरकार पडावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
राज्यातील पिकपाणी, कोरोनाबाबतच्या उपाययोजना, पाणी टंचाईबाबत उपाययोजन अशा राज्यासमोरच्या महत्त्वाच्या विषयांवर आज चर्चा झाल्याचे शेख यांनी सांगितले.
बंडखोर आमदारांबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शेख म्हणाले की, बंडखोर उमेदवारांबाबत बोलण्याची ही वेळ नाही बंडखोर उमेदवार महाराष्ट्रात आल्यानंतर त्यावर प्रतिक्रीया व्यक्त करु.