कारगिल विजय दिनी बोईसर येथे जनजागृती मशाल यात्रा संपन्न

Share

प्रतिनिधी:वैशाली महाडिक

 मुंबई,केसीएन क्लब सामाजिक संस्था, बोईसर जिल्हा पालघर चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नंदन मिश्रा यांनी कारगिल विजय दिनी बोईसर रेल्वे स्टेशन येथून सकाळी अकरा वाजता शहरभर  जनजागृती मशाल मोर्चा आयोजित केला होता, त्यात कारगिल योद्धयांसह जल, थल, वायू दलातील माजी सैनिक तसेच एन सी सी चे विद्यार्थी, विद्यार्थिनी सुध्दा मोठया संख्येने सहभागी झाले, कारगिल योद्धे व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला, माजी सैनिकांनी कारगिल पराक्रमाची यशोगाथा सांगितली, मशाल यात्रेत प्रमुख पाहुणे जयहिंद सैनिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  पंजाबराव मुधाने   उपस्थित होते, त्यांच्या व इतर मान्यवरांचे हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी पंजाबराव मुधाणे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांना कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या, मानवंदना देऊन सैनिक, शिक्षक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या जयहिंद सैनिक संस्थेत सहभागी होण्याचे आवाहन श्री मुधाने यांनी केले.

         मशाल यात्रेत पुणे, धुळे, डहाणू, पालघर , बोईसर येथील माजी सैनिकांनी हिरीरीने सहभाग घेतला, तसेच माजी सैनिक हितकारी संस्थेचे श्री भाऊराव तायडे, प्रज्ञा तायडे तसेच जयहिंद सैनिक संस्थेचे निष्ठावान कार्यकर्ते श्री दिपक बोंबले उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *