
बॅनरबाजीवरून भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्ष.
मुंबई,राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षाची परिसीमा ओलांडत आहे.पूर्वी मुंबईत जोरदार बॅनरबाजीचे वातावरण होते, तो आता शिवसेना-भाजप वादाचा विषय बनला आहे.नुकताच वरळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या दहीहंडीबाबतचा वाद अजूनही संपलेला नसताना शिवसेनेने एसी मार्केट बस थांबा, ताडदेव येथे नियमांप्रमाणे भाजपने लावलेले गणपती बाप्पाचे पोस्टर्स बळजबरीने हटवले आणि होर्डिंगव शिवसेनेचे बॅनर लावले. भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना माहिती दिली आहे की, “उद्धव ठाकरेंना आवाहन दिले आहे की, आमच्या नेत्यांचे नियम लक्षात घेऊनचं बॅनर्स लावले आहेत त्यावर तुमचे बळजबरीने बॅनर लावणे बंद करा, अन्यथा युवा मोर्चा आपल्या शैलीत उत्तर देण्यास सक्षम आहे.”या वादाचा कोणताही अंतिम पैलू आपल्याला दिसत नाही. याला उत्तर देण्यासाठी युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चा मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आज दिनांक7 सप्टेंबर तोजी सकाळी मुंबईतील ताडदेव परिसरात, एसी मार्केट बस थांब्यावर पोहचून शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांनी लावलेले होर्डिंग हटवून टाकले.
