
प्रतिनिधी :मिलन शाह
मुंबई, आशिक नावाच्या अपंग व्यक्तीने 2वर्षीया मुलीचे आपहरण केल्याचा गुन्हा वांद्रे पोलीस ठाण्यात दिनांक 19सप्टेंबर रोजी गुन्हा. दाखल झाला आहे. यात पाहिजेल आरोपी आशिक 30वर्षाचा आहे.

आरोपी हा दोन्ही पायाने अपंग आहे, त्याचे दोन्ही पाय गुढघ्यापासून नाहीत तरीही तो गुढघ्यावर चालतो. तो गर्द पितो तसेच भीक मागून उदरनिर्वाह करतो. सदरचा आरोपी हा मंदिर, मस्जिद, दर्गा, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी येण्याची शक्यता आहे तसेच नशेचे ठिकाणी देखील येण्याची शक्यता आहे. तरी आपण सर्वांना विनंती आहे की सदरचा संदेश आपल्या पोलीस ठाणेच्या प्रत्येक अधिकारी अमलदारपर्यंत पोहोचावा तसेच आपल्या संपर्कातील सर्व धंदेवाल्याना द्या. आणि सदर आरोपी अथवा मुलीबाबत काहीही माहिती उपलब्ध झाल्यास वांद्रे पोलीस ठाणेस संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे तसेच या बाबत काही माहिती मिळाली तर स.पो.नि. विजय आचरेकर
9870156221,स.पो.नि. बजरंग जगताप 9892231229,स.फौ.रमेश पेडणेकर 9769840490,
पो.ह.मदन मोरे 9768524508 यांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहेत
वांद्रे पोलीस ठाणे गु.र.क्र. 1620/22 कलम 363(अ),363 भादवी अन्वये गुन्हा दाखल असून नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे आशिक, वय अंदाजे 30 वर्षे हा आयत नावाच्या 2 वर्षे वयाच्या मुलीला दि.19/09/22 रोजी सायंकाळी 05:30 वा.च्या सुमारास वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पळवून घेऊन गेला आहे.