
प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार
मालाड, ता.27(बातमीदार)भाऊबीजेच्या निमित्ताने चिमुकल्या ताईने दादा ला पारंपरिक पद्धतीने ओवाळून भाऊबीज साजरी केली. मालाड मध्ये राहणाऱ्या आर्ची प्रमोद मूर्ती या चार वर्षाच्या चिमुकलीने आपल्या तीन वर्षीया आते भाऊ अंश रोशन दरेकर याची आरती ओवाळून त्याचे तोंड गोड करत पारंपरिक पद्धतीने भाऊबीज साजरी केली तसेच प्रसंगी एकदुसऱ्यांना भेटावस्तु पण दिल्या. मोठ्या माणसांना लाजवेल अशा पद्धतीने चिमुकल्या आर्ची ने भाऊबीज साजरी केल्याचे कुटुंबातील व शेजार्यांकडून कौतुक होत आहे.
