हवेत गोळीबार प्रकरणातील आरोपी ला अटक…

Share

प्रतिनिधी :मिलन शाह

ठाणे, दिवा शहरात घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 12 बोअरची बंदुक घेवून सार्वजनिक ठिकाणी दोन राऊंड हवेत फायरिंग करुन परिसरात भितीदायक वातावरण तयार करणाऱ्या सुरक्षा रक्षक असलेल्या व्यक्तीला दिवा (मुंब्रा) पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.ही घटना दिव्यातील मुंब्रा कॉलनी येथील,श्लोक नगर फेस 2 येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजता घडली.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार,दिव्यातील मुंब्रा कॉलोनी ,श्लोक नगर येथील परिसरात काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या मित्राच्या वाढदिवसानिमीत्त फायरिंग करुन दहशत माजवित असल्याचे व्हाटस्अँपवर मेसेज मिळाले होते.त्या अनुषंगाने सदरची खबर दिवा पोलिस चौकीला मिळाली होती.मात्र तपासाअंती निष्पन झाले की,सदरील घटना ही ठाणे येथे इंण्डसलँण्ड बँकेत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला असलेला इसम केदारनाथ अलगु राजभर वय-66वर्ष याने त्याच्या गावच्या प्रथेमप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आनंदाच्या भरात येवून आपल्याजवळील असलेल्या लायसन्स प्राप्त 12 बोअर बंदूकीने घराच्या बाहेर पडून हवेत दोन राऊंड फायरिंग केली होती.या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून दिवा पोलिसांनी बेजबाबदार फायरिंग करणाऱा इसम केदारनाथ अलगु राजभर याच्यावर भा.द.वि.कलम 336 सह शस्त्र(सुधारणा )अधिनियम 2019 कलम 25(9) प्रमाणे मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

व्हाटस्अँपवर फेक मेसेज व्हायरल….

याबाबत मिळालेली माहीती अशी की,जेडी शाळेसमोर, शिवसाई जेडी स्कूल समोर,शिवसाई मंदिर श्लोकनगर,फेस-2,मुंब्रा देवी काँलनी येथे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री 12वाजता हवेमध्ये 2 राऊंड फायर केला होता. यात मनोज साळवी नामक व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला होता.तसेच इतर चार ते पाच जणांची नावे जोडण्यात आली होती. हा मेसेज कोणीतरी समाजकंटकांनी खोडसाळपणे केला असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.दरम्यान याबाबत पोलीस तपास सुरु असल्याचे दिवा पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शहाजी शेळके यांनी सांगितले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *