राहुल गांधी विरोधात भाजयु मोर्चा मैदानात…

Share

प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार

मुंबई,राहुल गांधी यांनी  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या तरुणांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालय टिळक भवनावरb निषेध मोर्चा काढला. ‘भारत देश वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी टिळक भवन काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला. टिळक भवन काँग्रेस कार्यालयापासून काही मीटर अंतरावर पोलिसांनी त्यांची धरपकड केली.आंदोलनाची माहिती मिळताच भाजयुमोचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी  काँग्रेस भवन कार्यालयात चोक बंदोबस्त ठेवला होता.

या आंदोलनात शेकडो तरुणांनी संताप व्यक्त करत हे सांगितले की सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना आता आदित्य ठाकरे मिठी मारतील का ?असा प्रश्न ही आंदोलकांनी उपस्थित केला. 

भाजयुवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वात  आंदोलन करण्यात आले.   तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, भारत जोडो यात्रेतील पीआर स्टंटमुळे राहुल गांधींना पहिल्यांदाच इतके चालावे लागत आहे की त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर येऊन राहुल गांधी वीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करत आहेत.

हा एका महान क्रांतिकारकाच्या बलिदानावरचा हल्ला आहे, हा मराठी अभिमानावरचा हल्ला आहे आणि प्रत्येक सच्च्या भारतीयाच्या भावनांवरचा हल्ला आहे. हा देशाचा अपमान आहे. पण हे ज्यांच्या नसात भारतीय रक्त वाहते तेच समजू शकेल.

ज्यांचे रक्त इटलीच्या भेसळीने पांढरे झाले त्यांना वीर सावरकरांचे बलिदान कसे कळणार. खेदाची गोष्ट म्हणजे हिंदुत्वाचा अभिमान बाळगणाऱ्या आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरेही मराठी अभिमानावरील या हल्ल्याबाबत मौन बाळगून आहेत.  महाराष्ट्रातील जनता हा अपमान सहन करणार नाही. आमची मागणी आहे की राहुल गांधी यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांचा पीआर स्टंट दौरा तात्काळ थांबवावा.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *