
प्रतिनिधी :मिलन शाह
ठाणे, विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हयांचे वाढते प्रमाण लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सदर गुन्हयांचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी सुरु करुन प्रत्येक गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरुन तांत्रीक पुरावे व माहिती हस्तगत करून आरोपीताचे वास्तव्याची माहिती काढून नालासोपारा पूर्व मधून आरोपी नामे प्रथमेश शिवराम पवार, वय 24 वर्षे, रा. रुम नं-4, जेसीका चाळ, ओमनगर, मोरेगांव, नालासोपारा पूर्व ता वसई जि-पालघर यास दिनांक 21नोव्हेंबर रोजी ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तपासामध्ये त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून अटकेदरम्यान आरोपी कडून ₹4,88000/-किमतीचा सोनं आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले.
सदरची कामगिरी सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2. रामचंद्र देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,दिलीप राख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोउनि संदेश राणे, पो. हवा./सचिन लोखंडे, संदीप जाधव, संदिप शेरमाळे, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, पोकों रवी वानखेडे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सचिन ओलेकर, सागर घुगरकर, दत्तात्रय जाधव यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा.सचिन लोखंडे हे करित आहे.