
प्रतिनिधी :मिलन शाह
मुंबई, बॉलीवूड चे ज्येष्ठ अभिनेता तसेच मराठी नाटक व सिने श्रुष्टितील प्रसिद्ध विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी पुणे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधना ने मराठी सिने सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी हिंदीचे प्रसिद्ध चित्रपट अग्निपथ, खुदागवाह सारख्या सिनेमात बॉलीवूड चे सुपर स्टार अमिताभ बच्चन सोबत काम केले आहे. तसेच मराठीतील त्यांचे सिनेमा ही गाजले व नाटकातील त्यांनी केलेल्या भूमिकेची व अभिनयची हिप्रशंसा झाली आहे.बॉलीवूड मधील मोठ्या कलाकारां सोबत त्यांचे अनेक हिंदी चित्रपट सुपर हिट झालेत.