
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई, मढ येथील पासकल वाडीत एका घरात रसेल वायपर हा विषारी सर्प आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.या घटनेची माहिती सर्प मित्र रॉक्सन कोळी यांना दिली असता त्यांनी पासकल वाडीत धाव घेत त्या घरातील सर्प शोधून काढलं त्यानंतर मोठ्या सीताफिने त्या रसेल जातीच्या विषारी सर्पला जेरबंद केले. मागील काही महिन्यापासून मढ येथील अनेक भागात सर्प आढळले आहेत. सुदैवाने अजून कोणाला ही सर्प दंश झाले नाही. मात्र सर्प मित्र रॉक्सन कोळी यांना एका धामणी ला पकडताना तिने त्यांच्या हाताचाचावा घेतला होता परंतु धामण जातीचे सर्प विषारी नसल्याने त्यांचे प्राण वाचले. मढ परिसरात सतत सर्प आधळत आहेत या बद्दल सर्प मित्रांचं आणि पर्यावरण वाद्यांचे म्हणणे आहे की मढ येथील जंगल नष्ट होत आहे त्यामुळे सर्प आधळत आहेत. पर्यावरण जतन करने ही काळाची गरज आहे.