
प्रतिनिधी :मिलन शाह
मुंबई,काँग्रेस पक्षाला गौरवशाली परंपरा असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून स्वातंत्र्यानंतर जगाच्या पाठीवर एक विकासित राष्ट्र म्हणून उभे करण्यात सिंहाचा वाटा आहे. देश स्वतंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना आज काही पक्ष काँग्रेसने काय केले? असा प्रश्न विचारत असले तरी राष्ट्रनिर्मितीली काँग्रेस पक्षाचे योगदान कोणालाही नाकारता येत नाही. आज काँग्रेस पक्षासमोर आव्हाने असली तरी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष महाराष्ट्रासह देशभर विजयाचा झेंडा फडकवेल त्यासाठी काँग्रेसचा विचार रुजवण्याचे काम आपण करुया, असे आवाहन मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केले आहे.
काँग्रेस पक्षाचा 138 वा स्थापन दिवस साजरा करत असताना आपणास मोठा आनंद होत आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस यांच्या खंबीर नेतृत्वाखाली देशाने स्वातंत्र्याची लढाई लढली व अखेर इंग्रजांना हा देश सोडून जावा लागला. पंडित जवाहरलाल नेहरु यांची दुरदृष्टी व कणखर नेतृत्वाखाली देशाने वाटचाल सुरु केली व इंदिराजी गांधी, लाल बहाद्दुर शास्त्री, राजीवजी गांधी, डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रगतीची एकएक शिखरे पार केली. तर मा. सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने गोरगरिबांसाठी अन्नसुरक्षा कायदा, प्रत्येक हाताला काम मिळावे यासाठी मनरेगा योजना व माहितीचा अधिकार कायदा हे महत्वाचे कायदे आणले व त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. सर्व सामान्य जनता व सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम काँग्रेस सरकारनेच केले आहे. काँग्रेसचे हे यश कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
मा. सोनियाजी गांधी, राहुलजी यांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जून खर्गे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली देशात व मा. प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा विजयाची पताका फडकवेल. आज धर्मांध शक्तींचे मोठे आव्हान आपल्यासमोर असून लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धोक्यात आहे. लोकशाही व्यवस्था व संविधान वाचवायचे असले तर काँग्रेस पक्ष सक्षम राहिला पाहिजे आणि काँग्रेस पक्ष राहिला तरच लोकशाही व संविधान अबाधित राहील, त्यासाठीच काँग्रेसची सत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्रासह दिल्लीतही आणण्याचा संकल्प काँग्रेस पक्ष स्थापना दिनी करूयात, असे राजहंस म्हणाले.